ऑक्टोबर सेवा सप्ताहात आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाचा केला जागर
अलिबाग, कोकणनामा वृत्त- सामाजिक बांधिलकी आणि सेवेचे व्रत जपणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अलिबाग–मांडवा च्या वतीने आयोजित ‘ऑक्टोबर सर्विस वीक २०२६’ अंतर्गत विविध आरोग्यविषयक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्लबचे अध्यक्ष लायन हर्षद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या सेवा सप्ताहात आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक मदत, कर्करोगग्रस्त बालकाला आर्थिक मदत आणि रक्तदान यांसारख्या विविध जीवनदायी व लोकोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील हजारो गरजूंना प्रत्यक्ष दिलासा देण्यात आला.
सेवा सप्ताहाची सुरुवात १ ऑक्टोबर रोजी आरोग्य केंद्र सारळ येथे लायन्स ट्रू डायग्नो पॅथॉलॉजी लॅब चोंढी व ला. अमित नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मधुमेह तपासणी शिबिराने झाली, ज्यामध्ये ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यानंतर २ ऑक्टोबर रोजी बामणगाव ग्रामपंचायत कार्यालयात ला. प्रदीप पाटील (स्पॉन्सर) यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व डायबिटीस चेकअप शिबीर पार पडले. या शिबिराचा ५८ नागरिकांनी लाभ घेतला, ज्यामध्ये १३ मोतीबिंदूचे रुग्ण आढळले.
३ ऑक्टोबर रोजी झिराड येथील डॉ. राजेंद्र मोकल यांच्या क्लिनिकमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी ला. डॉ. राजेंद्र मोकल, ला. अभिजीत गुरव, ला. सतीश म्हात्रे आणि ला. निशिकांत लाड यांचे प्रायोजकत्व लाभले असून ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
बाल कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी लायन्स ट्रू डायग्नो पॅथॉलॉजी लॅब, चोंढी येथे विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये ला. उज्वला पाटील, ला. पवन गुप्ता व ला. सुधीर पुरो यांच्या प्रायोजकत्वातून कर्करोगाशी लढा देणाऱ्या चिमुकल्या अनन्या चौधरी हिच्या उपचारासाठी एकूण १५,००० रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
६ ऑक्टोबर रोजी चोरोंडे एमआयडीसी ग्राऊंड येथे वृक्षारोपण, सायकल वाटप व गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यातील ‘निसर्गबंध’ वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमासाठी डीसी एनवायरमेंट सॅमसन सोगावकर यांनी दिलेल्या देणगीतून १६ सायकलींचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरणासाठी जीएसटी कॉर्डिनेटर पीएमजेएफ ला. अनिल म्हात्रे प्रायोजक होते.

सेवा सप्ताहाचा गोफ विणून पूर्ण करताना ७ ऑक्टोबर रोजी कच्छी भवन, अलिबाग येथे लायन्स क्लब अलिबाग डायमंड आणि लायन्स क्लब अलिबाग, लायन्स क्लब मांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यासाठी ला. धवल राऊत यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते.
या संपूर्ण उपक्रमांत मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. हर्षद पाटील, प्रथम उपाध्यक्ष ला. प्रदीप पाटील, द्वितीय उपाध्यक्ष ला. उज्वला पाटील, सचिव ला. मृदुला राऊत, खजिनदार ला. निकिता पाटील, ला. नितीन अधिकारी, एमजेएफ ला. विद्या अधिकारी, ला. अभिजित गुरव, ला. धवल राऊत, ला. प्रीती पाटील, ला. मीनल राऊत, ला. सारिका पाटील, ला. सुमित पाटील, ला. मोहन पाटील, ला. अजय आंगणे, ला. चंद्रकांत मल्हार, ला. डॉ. राजाराम हुलवान, ला. ऋग्वेद ठाकूर, ला. सतीश म्हात्रे, ला. अरविंद घरत, ला. मानसी पाटील, ला. वृंदा मोकल, ला. जितेश्री ठाकूर, ला. जितेंद्र ठाकूर, ला. शितल सिनकर, ला. सुनिथा पॉल, ला. नेहा पाटील, ला. श्रुती सुतार, ला. हेमलता घरत, ला. पंकज केसरकर, ला. विलास पाटील, ला. हर्षल पाटील, ला. डॉ. राजेंद्र मोकल, ला. सुहानी म्हात्रे आणि ला. गीता कुलपे यांनी उपस्थित राहून विशेष परिश्रम घेतले.
